Saturday, May 12, 2018

Charoli 10




१३७- जाण काय असे 'गुरु' 'परीस' यात समान. परीस करी सुवर्ण लोखंडापासोन . गुरु सुवर्णस्पर्शे घडवी सत्शिष्य जाण . ज्ञानमय,प्रेममय, भक्तिमय त्यांचे अंतकरण.
१३८- गुरु परीस तरीही असती असमान. परीस करीतो लोहापासून सुवर्ण. गुरुमात्र लोहाचे परीसच करितो आपण. असे असें गुरुचे परीसापेक्षा वेगळेपण. १३९- गुरु आदर्श शिष्य घडवितो . 'विश्वात्मक गुरु'आदर्श शिष्य निर्माण करतो. वशिष्ठ- सांदिपनी यांनी घडविले राम कृष्ण . मच्छिन्द्र्नाथांनी केलं गोरख गोमायापासून निर्माण.
१४०- ठरविले होते लोहाचे परीस करण्यापेक्षा , परीसच निर्माण करावेजी . हाती लागले ते न्हवते लोह . निघाले ते आधुनिक कचकडे ओह . १४१- सोपं असत खेळण लढाई . असो ताकतीची,बुद्धीची चढाई. पण भानेच्या लढण लढाया , कठीण जातं रे रघुराया.
१४२- - मनस्वी,भावात्मक बुद्धी असतें जेंव्हा विश्वात्मकदेवमुक्तहस्ते देण्याची किमया करतो तेंव्हा. असता फाटकी झोळी आणि अस्वीकृतीचा अविचार , कसे होईल उत्थापन?काय करील कृपावंत किमयागार? dr sanjay honkalse drsanjayhonkalse2gmail.com 1Like ·


संसाराचा डोलारयाला देताना उभार,
करावे लागतात बरेच सोपस्कार . 
मोडताना सार कस असत  सोपस्कर ,
 
खरंच! डोंगर चढण असत कष्टप्रद 
 
उतरणीला पाऊले पडतात  झपझप
२३ /०८/२०१३ शुक्रवार. 

नाती हि नाण्या सारखी दोन बाजू असलेली असतात . 
पण त्यांना तीसरी बाजूही असते ज्यावर ती उभी राह्तात.. 
नात्याच्या तिसरी बाजू विश्वासाधारीत असते,
त्यावर नाते नेहमी  फळते ,फुलते 

विश्वास उडाला तर नाती जातात विस्कटून,
फ्रुललेला सारा  घरसंसार जातो मग कूसकटून 
मग कुणाच्या हाती काहीच राहत नाही,
तडकलेल्या मातीच्या भांडयासारखी नाती पुन्हा जोडता येत नाही

नाती हि असतात परस्पर पूरक 
जशी पती-पत्नी,गुरु-शिष्य बालक-पालक. 
पण काही नात्यांची परिमाणं वेगळी असतात,
एकाच तत्व प्रणालीत ती बसत नसत्तात 

जिवंत असे पर्यंत जपण्यापेक्षा नाती 
नात्यातील जिवंतपणा जपणे अशी असावी मती 
पण जेंव्हा तो जिवंतपणा येत नाही लादता 
तेंव्हा ती नाती , ना    तीहोऊन जात्तात 
-=-=-=-=-=-=-=-=---=-=-=-=--=-=-=-=-=-
सारे निग्रो असतात  कावळे  
कारण सर्व कावळे  असतात काळे,
तसेच सारे  निग्रो पण काळे,काळे,
तर्क शास्त्रात याला  " चुकीचा युक्तिवाद=हेत्वाभास "

हाच आभास होत चाललाय  सामान्य 
"
मूर्खांच्या स्वर्गात" आहे तो मान्य.
पहान  दु: कमी होत सुख वाढते वाटल्याने,
म्हणून दुसर लग्न केले आमच्या एका परिचिताने 


परधर्मीय जावई उदार मनानी 
स्वीकारण्याची तयारी दर्शवली   तिच्या पालकांनी,
त्याच्या घरच्यांनी पण दिला चटकन होकार,
म्हणून दोन्ही प्रेमिकांनी मोडले आपले लग्न,
कारण त्यांच्या प्रेमात नव्हता अडखळा विघ्न  

आपलसुख नेमकं आहे कशात 
ते आपल आपण ठरवायचं असतं 
आपण घोडा होऊन दुसर्यास स्वर होऊ द्यायचं 
कि आपण स्वत:स्वार होऊन उन्नत व्हायचं 

 

मन बुद्धिला देऊन श्रद्धेची फोडणी,
करावयाची श्रेयस/निश्रेयासाकडे जायची  जोडणी . 
खंर सुख कशात आहे हे ओळखून 
 
जायचं असत जीवन मुक्त होऊन
-- गणेश चतुर्थी सप्टे ,२०१३ ११:३० am 





No comments:

Post a Comment

Love

 Love  . . .dr sanjay honkalse best poem awrd by poetry.com Delivered to the students of Podar College M'bai- 26/11/ '96...