Saturday, May 12, 2018
Charoli 4
६५- नशीबवान आहेस तू, हे मला आता कळले
जे पाहिजे होते ते तू मिळवले.
आम्ही मात्र कमनशिबी ठरलो
जीवनाची बाजी न खेळताच हरलो
६६- त्रास होतो म्हणून पालकांना देण्याऐवजी वृद्धाश्रय
ठेऊन त्यांना वृद्धाश्रमात लाटले त्यांची काळजीचे श्रेय .
आणि वेळ नाहीं प्रेम व संस्कार करायला
म्हणून मुलांना दिला बोर्डिंग स्कूलमध्ये दाखला.
( १६ /१२ /२०११ )
६७-मुलांस बोर्डिंग स्कूल मध्ये दाखल करताना,
वाटेत लागले वृद्धाश्रम जातांना
वृद्धाश्रम दाखवूनच त्याला पुढे नेले,
जणू नकळत तरुणपणासाठी त्याला मार्गदर्शन केले
(१६ डिसेंबर,२०११)
६८- माणूस माणसाशी माणसासारख वागेल
तेंव्हाच माणसाचं माणूसपण जागेल
तेंव्हा व्यवहाराच्या भावनेला सोडून,
भावनेच्या व्यवहाराने जीवन जाईल रंगून.
६९- आपलं दुःख्ख विसरून ,स्वार्थास मुरड घालून,
व्हाव तिच्या आयुष्याच चांग भलं म्हणून,
तिला आयुष्यासाठी तयार केलं,जाणत केलं
मोठेपण मिळाल्यावर तिने माझ्या मनात रणकंदन माजवलं
(१६ डिसेंबर,२०११|)
७०- जीवनी काही बंध असे असती ,
बंध भावातच जीवनी खुशाली वसती ,
अश्या बंधनाशिवाय जीवनात राम नाही
काही बंध बद्ध करतात,त्यात चैन,आराम नाहीं
१६ डिसेंबर,२०११
७१ - विज्ञान तंत्रज्ञानाने घेतली उंच भरारी
दूरच्या घटना,खेळ क्षणात दाखवी साक्षात आपल्या घरी --
समाज संस्कृती याचा दुरावा दूर करण्यात यश आले जरी
जवळ,शेजारी वसलेल्या भावबंधात निर्माण करते एक दरी
(१७ डिसेंबर,२०११)
७२- जगाबद्दल तुच्छता दाखवते ती डोळ्यांनी .
आगीसारखे निखारे निघती तिच्या वदनान्तुनी.
स्त्रियांच नव्हे, पुरुषही राहती तिच्यापासून बीचकुनी.
अशी आमची मैत्रीण,सुंदर गोडवा तिच्यात,रानफुलासारखी मर्दानी.
(१७ डिसेंबर ,२०११)
७३- आजची तरुणाई ,परिपूर्ण नवलाई .
झटक्यात करती एखाद्याशी दिलजमाई,
तर फटक्यात निर्माण होई संबंधात खाई
जीवनात' टाइमपास'करताकरता'टाइमपास जीवन'होई.
( १७ डिसेंबर,२०११)
७४- कधी कधी डोळ्यांना दिसत तसं नसत,
तर कधी नुस्त ऐकीवावरच मन फसत
जाणीवेसाठी दृक-श्राव्य समन्वय होण आवश्यक भासतं.
कारण डोळे व कान या मध्ये चार बोटांच अंतर असतं .
(१९ डिसेंबर,२०११)
७५- जोतिष्याने दीर्घायुष्याचा योग आहे म्हणून त्याला सांगितले,
आजच्या युगात असा शाप नको म्हणून त्याने लग्न केले.
पण हायरे किस्मत भाग्य त्याचे नाहीं बदलले.
लग्नामुळे आहे तेंच आयुष्य त्याला दीर्घ भासू लागले.
( १९ डिसेंबर, २०११)
७६- ये चल करूया ऐश,
'त्याची' तर धत तेरे की.
चल करूया जीवन कॅश
'त्याची' तर धत तेरे की.
७७- काही जण कधीच टाकत नाहींत आपली कात,
कितीही प्रयत्न केले तरी ते दाखवतात आपली अवकात .
नळकांड्यात ठेवले तरी कुत्र्याचे शेपूट सरळ नाहीं होत .
व अपवादाने झाले तरी तो आपला स्वभाव नाहीं सोडत .
(१९ डिसेंबर,२०११)
७८- काही संबंध हे कोणाचे मोहताज नसतात
ते कुणा तिसऱ्यामुळे तुटत नसतात.
तसे तुटले तर त्यांची वाट दूर जाते.
आणि संबंधांची पुरी वाट लागते.
(१९ डिसेंबर,२०११)
७९- काही घटना, काही संबंध अर्धवटच राहतात ,
काही विचार मनातच कुठतरी दडी मारून बसतात .
शब्द शोधण्यात एवढये व्यस्त होऊन जातो तेवढ्यात
कळत हि नाही कधी आपले परके होवून जातात .
(१९ डिसेंबर,२०११)
८०- दूनिया रंग रंगीली बाबा,रंग रंगीली किती.
विचित्र तिची रिती भाती.विचित्र येथील नाती.
बॉसच मांजर मेलं तरी अनेकजण सांत्वना येती.
पण बॉसच गचकला तर कुत्रही तेथे न फिरती
(१९ डिसेंबर,२०११)
८१- इतरांच्या जखमा भरता,भरता,व डोळे पुस्तापुस्ता,
त्यांच्या आयुष्याला चांगले वळण देता देता
माझ्या जखमा कधी विरघळल्या ,नासूर बनून गेल्या.
नशिबाने माझा अश्वत्थामा करून टाकला हेही नाहीं कळले
८२ - माझ्यावर प्रेम करा वा करा तिरस्कार
दोनही परिस्थितीत मी तुमच्या जवळ असणार
प्रेम केलेत तर तुमच्या हृदयात वास करणार .
तिरस्काराने तुमच्या डोक्यात जाणार.
(१९ डिसेंबर,२०११)
८३ - जिथे इच्छा तिथे मार्ग असतात.
प्रबळ इच्छेपोटी पावलं हलकी सहज पडतात
अन ध्येय सहज साध्य होऊन जातात .
आयुष्यात निखळ निरामय आनंद देतात.
(१९ डिसेंबर,२०११)
८४- - किती छान वाटते, किती असे सुंदर
पाहणं आनंद आपल्या माणसाच्या चेहऱ्यावर .
आणि त्याहून सुंदर असत कळणं
की आपणच आहोत त्या आनंदाचे कारण.
( 19 डिसेंबर .२०११ .)
८५- - सूर्य तोंच असतो ,किरण मात्र नवे.
ऋतू तोंच येई पुन्हा , वर्ष नवे हवे
नदी नेहमी तींच असे ,जल मात्र नित्य नवे .
जीवन चक्र अव्याहत असतें ,आयुष्याचे पर्व नवे.
८६ -शरीर पंगु झाले तरी चालेल,
पण मन पंगु होता नये.
जिथे, मन रमत नाहीं,आराम नाहीं,
तिथे शरीराला त्रास देण्यात राम नाहीं.
८७- विश्वनाथाने सुंदरता,गोडवा बहाल करून केली स्त्री निर्माण.
दुनियेच्या प्रत्येक कोपऱ्यात ती मिळेल ,दिले मानवांस वरदान.
पण त्यामुळे माजेल हाहाकार याचे आल्यावर भान.
दुनियाच करून टाकली गोल,वाचवली आपली मान.
(१९ डिसेंबर,२०११)
८८-- काही बंध,बंध भावातच जीवन करतात समृध्द .
बंधा शिवाय आयुष्य वाटते त्यांना क्रुद्ध
तर या उलट काही असतात असे बंध.
करून टाकती ते आपले 'जीवन-बद्ध'
(१९ डिसेंबर,२०११)
८९ - नाहीं माहित काय आहे नशिबाच्या पोतडीत .
आयुष्य पुन्हा एक चान्स देईल का नाहीं माहित.
कळत नाहीं दुःख कसलं आहे आयुष्य वाया गेल याच,
की नशिबाची पोतडी उघडता येत नाहीं त्याच.
२१ डिसेंबर,२०११
९० - काहीजण जीवनभर दुःख,फसवणूक गुपचूप झेलतात.
दाहक दुःखाने मरेपर्यंत नाहक मरत असतात.
न सगे सोबती, न भाऊ बहिण,न मुल बाळ.
श्रीमंती असूनही,त्यांच्या पायात दुर्दैवाचे चाळ.
९१- सुरैय्या,परवीन,नादिरा,देविकाराणी,मीनाकुमारी
या सर्वांची जीवनी दाखवते दुर्दैवाची फेरी.
गडगंज श्रीमंती,थाटमाट,घरदार, भरपूर गंगाजळी.
गंगाजल पाजण्या नाहीं कुणी अशी आली त्यांच्यावर पाळी
- ९२- आठवणी जेंव्हा आपणास एकांतात कवटाळतात.
तेंव्हा मनपटलांवर त्यांची चलचित्र सैरावैरा पळतात.
आणि चटकन तेंव्हा डोळ्यांत अश्रू दाटून येतात .
पण गालांवरील अश्रू टिपायला आठवणींतील पात्रे नसतात.
(२० डिसेंबर,२०११)००:०० Hrs .
९३- आपल्याला मिळालेल्या जखमा,
असतांना न भरण्या जोग्या.
इतरांचं दुःख हलक करण्या,
चालत राहिलो पुढे पुढे उभ्या करीत गुढ्या,
सुधारत चुका जमतील तेवढ्या.
९४-तसं कुणाच कुणावाचून अडत नाहीं
तरी एकोप्याच रहस्य दडत नाहीं.
एकोप्याशिवाय आयुष्य घडत नाहीं.
व यशाचा आलेख चढत नाहीं.
९५- पैशाला नक्कीच आहे मोल,
पण प्रेम भावना आहे अनमोल.
प्रेम वाळवंटात गारवा देतं.
दुष्काळात बहार निर्माण करतं.
९६-आशिक असावं पण आसक्त असू नये.
आसक्ती पोटी कान हलके असतात बये
मन उदारते पासून दूर दूर जाते.
आयुष्यात घुटमळ, फरफट वाढते
(१९ डिसेंबर,२०११).
९७- जीवनानंद मिळवतांना होऊ नये जीवनासक्त
आसक्ती पोटी मोह निर्माण होतो सख्त .
मोहापोटी निपजतो मानवात अहंकार फक्त
जीवनमृत्यु चक्रातून मग होता येत नाहीं मुक्त.
(१९ डिसेंबर,२०११)
९८- प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं .
पण तुमच आमचं सर्वांच सेम नसतं.
काय कामाचं प्रेम नुसतं ?
व्यवहारात ते व्यक्त व्हाव लागतं.
२१ डिसेंबर,२०११
९९- कागदावर शंभर वेळा अग्नीच चित्र काढल जरी,
अग्नी निर्माण होत नाहीं त्यातून तरी.
तसंच प्रेम प्रेम म्हणून ते सिद्ध होत नसतं .
सत्वाच्या अग्नीपरीक्षेत ते खर उतरावं लागतं .
९९- आसक्त असावं तर असावं फक्त प्रेमासक्त.
प्रेमासक्त देतो प्रेम अतूट ,विना अट.फक्त.
जीवनानंद घेता येतो न होता जीवनासक्त.
मग मार्ग होतो मोकळा होण्याचा 'बंधमुक्त'
(१९ डिसेंबर,२०११)
१००- प्रेम एवढं अनन्य असेल जर,
अनन्य प्रेम किती चमत्कार करेल तर
प्रेमासक्त होणे म्हणजे करणे प्रेम अनन्य
तेंव्हा रंग,रूप,विचार,वस्तू असतात अन्य अन्य
मात्र ते पाहणारे,उपभोगणारे आपण होतो अनन्य
Subscribe to:
Post Comments (Atom)
Love
Love . . .dr sanjay honkalse best poem awrd by poetry.com Delivered to the students of Podar College M'bai- 26/11/ '96...
-
KUNDALINI: THE DIVINE MOTHER, Be it fire,sound,heat, magnetism, Nano or technology fudgy. In everything YOU manifest oh! Divine Mo...
-
६५ - नशीबवान आहेस तू , हे मला आता कळले जे पाहिजे होते ते तू मिळवले . आम्ही मात्र कमनशिबी ठरलो जीवनाची ...
-
मी आणि माझ वढाय मन ....... २ भौतिक सुखाचा प्रयत्न प्रगतीत स्थिरावतो . आत्म्याची उन्नत्ती अध्यात्म साधतो भौतिक सुखात...
No comments:
Post a Comment