२४-नाती संबन्ध तिथे वर
ठरवली जातात ,
इथे ती फक्त निभावली जातात,
या जन्माची पोतडी रिकामी सही ,
पुढील जन्मासाठी मला काही बाकी ठेवायचं नाही.
२५-एखाद्याला सोडून देणे
नेहमी नाहीं दाखवत स्वभावातील उणे
खरतर कधी कधी सोडून देणारा
जास्त खंबीर असतो खरा
१४
नव्हेंबर २०११ १०:२० सकाळी
२६- कां तू
दिसत्ये मला नित्य ?
खर सांग तू कोण स्वप्न की सत्य?
स्वप्नात तू नित्य माझी असतेस
तर सत्यात तो फक्त स्वप्न होतेस.
(१४ नव्हेंबर,२०११.१०:३० सका )
२७- चुका करतो तो माणूस
पण
चुकते ते नशीब,
आणि ते साल नेहमीच चुकते
न ठेवता कुणाचीही आब
(२७ १० २०११) **
२८- स्वाभिमान ठेचला गेला तरी
चांगुलपणा सुटत नाहीं
असे असूनही जमान्याला तो
चांगुलपणा खपत नाहीं
२७/१०/२९११
३३- गोड वाणी घेऊन आली जन्मास स्त्री
पण
झाली तिची वटवट सावित्री
गप्प बस सांगणारा पुरुष मूर्ख असतो,
मिटल्या ओठांनी तू सुंदर दिसते हे सांगून
तिला गप्प करणारा मात्र हुशार ठरतो.
१७ नव्हेंबर,२०११:१८:३०
३४-प्रेम म्हणजे ,प्रेम म्हणजे जरी प्रेम असत
प्रेम करण्याजोग कुणी बसण्यापेक्षा शोधत
आपल्यावर प्रेम करणार कुणी शोधनं सोप्प असत
१७ नव्हेंबर,२०११,१८:४०
३७-विश्वास असेल तर
संवाद होतो
अविश्वासपोटी वाद प्रसवतो
कठीण आहे believe करणे त्यांच्या वाटचालीवर
कारण believe मध्ये lie आहे वस्तीवर
१८ नव्हेंबर,२०११ .0८ :oo
३८
- जल तहान भगवते हे सत्य होय
मृगजळ हे भासमान ,म्हणून मिथ्या,
believe मध्ये be आणि ve (be +ve ) भासते
पण be व ve मध्ये
lie हे
veला मृगजळ बनवते ...
22/11/11/24:00hrs
co
३९ - विश्वबंधुत्व लाभो प्राणिजात
त्याचसाठीच अवतारकार्य बाबाजींचे या विश्वात
भुक्ती,मुक्ती तृप्ती लागूद्या गांठी
प्रसन्न व्हा बाबाजी ,उघडा ताटी.
२६
नव्हेंबर २०११.८:००
४०- आयुष्य संपता संपता लक्षात आलं
अनंत अनुभव गाठीशी आले
लाभले सखेसोबती व प्रेमपण
दीर्घजीवी इमानास तरसला जीवन
२६ नव्हेंबर २०११ .८:००
४१-पूण्यनगरीचा महिमा काय वर्णावा असे ती
सदाबहार,
त्यात शिरपेंच असे ते " विद्येचे " माहेरघर .
"माहेर"चा पगडा "विद्या"वाट किती ग बाई
त्यासाठी ती बाहेरगावी नांदायला धजत नाई
२६ नव्हेम्बर२०११.८:००
४२- पुणे, पुणे, पुणे तिथे काय उणे
विद्या,संस्कृतीचे लाभले तिला देणे.
पण हाय "राम तेरी गंगा मैली"
तीच अवस्था मुळा-मुठा यांची झाली
कुणी नाहीं तिच्या शुद्धीकरणाचा वाली ,
२६ नव्हेंबर,२०११.८:००
४३- आयुष्य हे सतारीसारखे असते
सखे-सोबती ज्याच्या तारा असती
सूर छेडले जांवो वा न जांवो
पण बंध मात्र कायम हे जाणावो.
२६ नव्हेंबर २०११.८:१५
४४- हे मानवा तू असा वाग
ईश्वरास विचार करण्या भाग
'हा तोंचका ज्यास मी धर्तीवर धाडले
की हा तो जणू पुनःप्रकट करतोय मले
२६
नव्हेंबर,२०११. ८:३०
४५- मनुष्य जन्म हा
हिरा खरा
ये जिंदगी न मिलेगी दोबारा .
जर योग्यरीतीने प्रयत्न झाला तो व्यतीत करण्या
तर एकच जन्म पुरे देह -ध्येय सार्थकी लागण्या
२६ नव्हेंबर ,२०११
आपकी खातीर ;
५४--रोज मरे त्याला कोण रडे
अनुभावान्तीही ज्याच राहणे कोरडे
राही वागणे श्वान पुच्छा सारखे वाकडं
त्याच आयुष्य निःसंकोच राहतं कोरडं
६ डिसेंबर,२०११.००:०० hrs
५५- "शालीनता" तुम्ही काय करता यावर नाहीं
तर
जे करता ते कसं व कां करता यावर राही
म्हणून तर पोटावर चाकू ठेऊन लुटणारा चोर
तर
तोच चाकू शल्यक्रिये साठी वापरणारा सर्जन थोर.
६ डिसेंबर,२०११.००:००
५६-जर मार्ग चांगला असेल तर
तर तो कुठे जातो हे महत्वाच नाहीं
जर ध्येय योग्य असेल तर
मार्ग कसा आहे हे
दुय्यम राही
६ डिसेंबर ,२०११ ००:००
५७- विचारांपासून उपजतो प्रसव जीवनानंद जीवन विषाद
विचार तसा विकार---->जीवन विषाद
विचार तसा विकास ---.> जीवनानंद
गुणात्मक विचार जीवनानंद प्रसवतो
गुणात्मक संगत गुणात्मक विचार रुजवतो.
7 डिसेंबर,२०११.१९:००
५८-
देवकी पेक्षा यशोदा मोठी,देवकी पेक्षा यशोदा मोठी,
कारण जन्म देणाऱ्या पेक्षा घडवनार्याची लागते सचोटी
कावळ्याकडे आपली अंडी उबवायला देणारी कोकिळा धूर्त
पण दुसर्याची कोख उजळवणारी कावळीन श्रेष्ठच मूर्तिमंत.
७ डिसेंबर,२०११.१९:२०
५९- मार्ग दर्शक म्हणून मार्ग दाखवता दाखवता
ध्येयाच्या वाटचालीत सहमार्गस्थ व्हायचा मानस होता
पण
सह्चार्यांनी पहिली फक्त प्रासंगिक निकड
करून टाकला फक्त मला "मैलाचा दगड".
७ डिसेंबर,२०११.१९:३०
६०-
मनाच्या विचारपटलावर (कॉम्पुटरवर)केलं थोड 'गुगल '
शोधण्या फरक काय असे जोडी व युगल
लक्षात आलं जोडीत दोघे असतात पण एक
वाटतात
युगलमध्ये दोघे भासतात पण एकच असतात
७ डिसेंबर,२०११ १७ :३५
६१- कोण जोडी कोण युगल ?
केल्यावर मन पटलावर परत 'गुगल'
लक्षात आलं लक्ष्मी-नारायण हि
जोडी
तर राधा कृष्ण युगल buddy
७ डिसेंबर,२०११.१९:४०
काही जण आपल्याकडून शिकून जातात .
तर काहीजण आपल्याला काही शिकवतात .
तर काही कानामागून येऊन तिखट होतात
(१६ डिसेंबर २०११)
६३- जीवनात टाईम-मशीन असती तर बहार आली असती.
चुका सुधारायसाठी भूतकाळात शिरायची नसती धास्ती
काढता आली असती पुस्तकासारखी जीवनाची नवी आवृत्ती
जीवन नव्याने जगण्याची घेता आली असती अनुभूती
(१६ डिसेंबर,२०११)
६४ - जीवन हे गाडीसारखे पुढे सरकत असतें
म्हणून तर त्याला जीवन गाडी म्हणतात.
गाडी ही रिवर्स गिअर मध्ये जाऊ शकते
जीवनअसतें समयासारखे, परत मागे नेता येत नसते
No comments:
Post a Comment