नवी इसापनीती :कावळीणीचा आक्रोश ---> संजय
होनकळसे.
{१९९९ साली,aagust च्या ९ तारखेला सुवर्ण मंदिराची प्रतिकृती अमृतसर येथील दुर्गीयाना मंदिरात अमरनाथ यात्रेचं अनुभवालोकन करताना एक विचार जन्मला.माझे युवा विद्यार्थी मित्र ,माझ्या MANAGEMENT BY SPIRITUAL QUOTIENT या सिद्धांताच्या मुळे , घडत होती ,वाढत होती :

मार्ग दर्शक म्हणून मार्ग दाखवता दाखवता
ध्येयाच्या वाटचालीत सहमार्गस्थ व्हायचा मानस होता
ध्येयाच्या वाटचालीत सहमार्गस्थ व्हायचा मानस होता
पण सह्चार्यांनी पांहिली फक्त प्रासंगिक निकड.
करून टाकला फक्त मला "मैलाचा दगड".
हे होणार होतं हे मला माहित होतं.कारण मी ते अपेक्षे पोटी करत न्हवतोच मुळी. पण तरीही मानवी पातळीवर त्यावेळी कावळीणीचा आक्रोश कुणाच्या वाट्याला न येवो अशी विचारधारा मी मांडली.सतत हा विचार मनात येत होता .त्यावर लिहावेसे वाटत होते पण एकच ओळ जी एका इंग्रजी कवितेत मी मांडली एवढेच.दरम्यान वरील चार ओळींप्रमाणे मी इच्छा नसतांनाही "मैलाचाच" दगड ठरलो होतो.पण अचानक आज प्रदोषाच्या दिनी १२व्या महिन्याच्या १२व्या दिनी हिंदू महिन्याच्या १२ तिथीस सकाळी १२ वाजता एक न्हवे तर चव्वे चाळीस ओळी लिहल्या गेल्या }
माहीत आहे सर्वांस गोष्ट ससाकासवाची
तशीच गोष्ट कोकीळ कावळीणीची
ऐका नवी इसापनीती,कोकीळ करु शकते कुहुगान
कारण त्यांस कावळीणीचे वरदान
कारण त्यांस कावळीणीचे वरदान
कोकिळेच नेहमी प्रशंसतात धूर्तता आणि होश
कारण ती आपली अंडी ठेवते मिळ्ण्या कावळीणीचा आघोष.
कोकिळेच
होते प्रशंसा,मिळतो,
मान
मरातब.
कावळीणीला कुठे कळतो आप मतलब ?
कावळीणीला कुठे कळतो आप मतलब ?
फिगर सांभाळणार्या स्त्रीसम कोकिळेला कुठे ममत्वाची जाण.
पण
गान गुंजनात ती
नक्कीच होते कीर्तिमान.
आपल्या साजबाजात तिला नसते प्रसवशास्त्राचे ज्ञान. कावळीण मात्र मायेने उजवते तिची पिल्ले,विसरून देहभान.
आपल्या साजबाजात तिला नसते प्रसवशास्त्राचे ज्ञान. कावळीण मात्र मायेने उजवते तिची पिल्ले,विसरून देहभान.
तर कावळीणीमुळे
राखते कोकीळ आपले
कीर्तिमान अढळ.
कावळीण दुजाभाव ठेवत नाहीं ,मन तिचे सढळ.
कावळीण दुजाभाव ठेवत नाहीं ,मन तिचे सढळ.
सारेजण मानतात कोकिळेची
हुशारी व जोश.
कावळीण मात्र
आपल्या ममत्वाच्या भावनेत
राहते बेहोष.
पण हाय!जन्मताच कोकीळपिल्ले उडून जातात भुर्र
कावळीण बसते
दुःखात बडवत आपलं
उर
कोकीळ
मनवते जोशपूर्ण जल्लोष
पण
कुठे दिसे कुणाला कावळीणीचा आक्रोश..??
कोकीळ
गुंजनाचा आस्वाद जरूर
घ्यावा
.
पण कावळीणीचा
आक्रोश कुणाच्या वाट्यास
न यावा. कोकीळा
ठरते कुमाता जनहो!हे जाणावे.
कावळीण मात्र ठरते 'खरी' जाया 'जाता '
कावळीण मात्र ठरते 'खरी' जाया 'जाता '
.
जोपर्यंत कावळीण मानली जाईल शुद्र
कसा होईल समाज तोपर्यंत प्रगत,भद्र...?
जोपर्यंत कावळीण मानली जाईल शुद्र
कसा होईल समाज तोपर्यंत प्रगत,भद्र...?
ठेवत
असता,देत
असता कोकिळेला मान.
व्हावा कावळीणीच्या
भावनेचा,त्यागाचा
सन्मान.
देवकीपेक्षा यशोदा मोठी,देवकीपेक्षा यशोदा मोठी,
कारण जन्म देणार्यापेक्षाही घडवणारा याची खरी सचोटी.
कावळीणीकडे
उबवायला देणारी कोकिला
जरी
धूर्त,
तरी
दुसऱ्याची कोख उजळवणारी कावळीण श्रेष्ठच.मूर्तिमंत.
कितीही
मिळवली कोकिळेने प्रसिद्धी,ख्याती
.
कावळीणीच तिची खरी MENTORजाणावे निश्चिती.
कावळीणीच तिची खरी MENTORजाणावे निश्चिती.
हे
मानवा!असेच
MENTOR समाजात आहेत हे
तू जाण.
लक्षात घे त्यांचा पण झाला पाहिजे सन्मान
लक्षात घे त्यांचा पण झाला पाहिजे सन्मान
.
हे
झाले तर...............
तर नक्कीच होतील
अनेक सचिन,विवेकानंद,अन योगानंद
जे उंचावतील आपल्या MENTORचा सन्मान,व कीर्तिचा गंध.
हेची दान देगा देवा!....हेची दान देगा देवा ................ कोकीळच अस्तित्व राखणाऱ्या कावळीणीचा विसरन व्हावा
कावळीनकोकिळा असच वागत राहणार त्यांचे तेच कर्म
कारण त्या "भोगयोनी"च त्यांचा तोंच धर्म
मानव जमातीसाठीच इसाप्नितीचे वर्म.
कारण आपली "कर्मयोनी"उद्धार,कृतज्ञता हे त्याचे मर्म

No comments:
Post a Comment