मी आणि माझ वढाय मन .......२
भौतिक सुखाचा प्रयत्न प्रगतीत स्थिरावतो.
आत्म्याची उन्नत्ती अध्यात्म साधतो
भौतिक सुखात साधते पाप-पुण्य,ममत्व .
अध्यात्म ,पापपुण्य पलीकडचे,साधते समत्व .
भौतिक प्रगती पोटी चंचलता वाढते ,
अधाय्त्मिक उन्नत्तीत सुखदुःख समान भासते ,
अध्यात्म नदीच्या पाण्यातील तरंगांसारखे असतें,
पडो त्यात मातीची वा
सोन्याची वीट,येणारे तरंग समान असतें.
--
सर्याची पिल्ले होणे हा शाप मानतात,
कारण ती सूर्यापेक्षा खचितच श्रेष्ठ ठरतात. .
खरच "पिकते तिथे विकले जात नाही
" ,
पिल्लांच्या खुजेपणाने आलेले सूर्याचे अश्रू कुणालाच दिसत नाहीत .
( ३० ऑक्ट २०११, रविवार )
निळसर गगनाचा कसा दाखवणार अंत ,
समुद्र कसा कळणार पाणी घालून शिंपल्यांत ,
कितीही येरझार्या मारल्या बेडकाने विहिरीच्या आंत,
तरी कशी येणार त्याला अनंतत्वाची जाण हीच बाह्य जगातील बेडकाची खंत.
( ३०
ऑक्ट २०११, रविवार )
कुठे तुझा माझा मेळ,
जमली तरी आपली भेळ.
कसा हा नियतीचा खेळ
फुटला पाझर,दगडाला आली वेल
( 18 ऑक्टोबर
,२०११.मंगळवार
)
जर मन व हेतू असेल शुद्ध ,
कसा होईल कुणी बद्ध .
कारण यशास असतात अनेक पंख
अपयशी व्यक्तीची कोण करतो खंत .
३ नोव्हेंबर ,२०११ गुरुवार १७:३०
चोर कधीकधी संन्याशाच्याच भाषेत बोलतो,
आणि चोरच संन्याशाला चोर ठरवतो
नुस्त चांगलं असून या जगात कुठे भागतं
चांगुलपणाला हुशारीच सामर्थ्य असाव लागतं.
हक्क दाखवणारा जरी नाते संबधाने जेष्ठ असतो ,
तरी त्याच्या पेक्षा कर्तव्य पार पाडणारा श्रेष्ठ ठरतो .
हक्क दाखवणारा प्रत्येक कामात आडवा येत राहतो,
तर कर्तव्यतत्पर नेहमी संकटातपण बाजूने उभा ठाकतो
४ डिसेम्बर २००८. चंपा षष्ठी
शब्दांपेक्षा शस्त्र धारदार असत,
शस्त्र मान तर
शब्द मन कापत
शस्त्र रक्त तर
शब्द अश्रू सांडते
शस्त्राची जखम भरणे सोपे असतें
शब्दांची जखम भरणे अत्यंत कठीण जाते.
कधी खायला नाहीत चणे,तर कधी चावायला नाहीत दांत
स्वाभिमान ठेचला गेला तरी चांगुलपणा नाही जाता जात
आणि म्हणूनच नकोशी माणसे नको तेंव्हा येतात,
हक्क दाखवत डोक्यावर आपल्या मिऱ्या वाटत बसतात .
(३० ऑक्टोबर,२०११.रविवार.)
कठीण असते समुद्रासारखाच
स्त्री मनाचा लागण थांग ,
तरी तिने दिलेल्या जखमांच
ओझ
असत अथांग .
मानवी मन हे मेणासारख असत ,
परिस्थितीनुरूप ते आकार बदलत .
आत्मा हा दीपस्तंभासारखा असतो,
अनंत जन्माचे संस्काराचा प्रकाश दाखवतो
(१५ सप्टेंबर, २००११. २१:०० hrs ) .
नाती कधी असूनही नसतात,
तर कधी नसूनही असतात.
कधी कळतनकळत उमलतात,
तर प्रथम भेटीतच खुलतात.
आंधळेपणाने प्रेम केले तर,
जाणीवा मंद असतात.
जो पर्यंत डोळे उघडत नाहीत ,
तो पर्यंत कानही बंद असतात.
(४,डिसेम्बर,२००८.चंपा षष्ठी )
२७-
चुका करतो तो माणूस
पण
चुकते ते नशीब,
आणि ते साल नेहमीच चुकते
न ठेवता कुणाचीही आब
(२७ १० २०११) **
२८- स्वाभिमान ठेचला गेला तरी
चांगुलपणा सुटत नाहीं
असे असूनही जमान्याला तो
चांगुलपणा खपत नाहीं
२७/१०/२९११
२९-जीव गुंतलेल्या एखाद्या पासून दूर जाणे
कोण म्हणतो दर्शवतो स्वभावातील उणे,
खर तर अस
करणारा म्हणे
जास्त खंबीर असतो हे कुणी न जाणे
१५/११/२०११
३०-आपली चमक दाखवायची असेल जर,
तर मोत्याने शिंपल्यातून बाहेर पडण आवश्यक असत,
नाहीं तर कमलपत्रावर पडलेलं दवबिंदूपण
आपली चमक दाखवून जात.
१७ नव्हेंबर,२०११ .१६:०
० 31- स्त्री जन्माची कहाणी
जनली ती पुरुषाच्या
'अंगा'पासोनी
नव्हे त्याच्या डोक्यावर करण्या मिरे वाटणी.
नव्हे होण्या त्याची पाय पुसणी
तर होण्या त्याच्या हृदयाची राणी
बाहुपाशात बरोबरीने करण्या विसावणी
(17 navhembar,2011/17:36)\\
स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी,
बहाल केली सुंदरता तुला देवांनी ,
वर दिली बोनुस म्हणून सुंदर वाणी,
पण विसरला द्यायला बुद्धीला विवेकाच पाणी,
त्यामुळे ती एकतर करते डोक्यावर मिरे वाटणी ,
नाहीतर होऊन बसते त्याची पाय पुसणी
१७ नव्हेंबर,२०११.१७:५५
२१-प्रेम आंधळे असले तरी
ते डोळ्यांनीच बोलत असतें..
थोडस हळवं असलं तरी
ओठातच मुक असते.
22 माझ्या मनाचा माझ्या बुद्धीशी झगडा आहे
मनाचं रस्ता सरळ आहे ,बुद्धीचाच रस्ता वाकडा आहे
२३-तुझ्यावर हे माझ्या गोजिरवाण्या मना
आयुष्याच्या वैचीत्र्याने घाव घातले किती घणा घणा
इतके की त्याने मोडून गेला माझा कणा
तरीही सोडला नही प्रामाणिकपणा
१३ नव्हेंबर ,२०११.
No comments:
Post a Comment